उपराष्ट्रपती कार्यालय

भाषा संवर्धन आणि विकास ही जनचळवळ व्हावी-उपराष्ट्रपती


भाषा ही संकृतीची जीवनवाहिनी आहे : उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2019 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2019

 

भाषेचे संवर्धन आणि विकास हे केवळ सरकारचे काम नसते तर ती जनचळवळ झाली तरच हे काम यशस्वी होऊ शकते, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आज के के बिर्ला फाउंडेशनने आयोजित केलेल्या 28 व्या सरस्वती सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

देशातील विविध भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या साहित्याचा सन्मान करण्याच्या बिरला यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याचा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचं त्यांनी सांगितले. भाषा ही संस्कृतीची जीवनवाहिनी असते, असे सांगत भाषेचे संवर्धन, विस्तार आणि वापर करण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवेत असे उपराष्ट्रपती म्हणाले.

मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक पातळीवरच त्याचे शिक्षण सुरु करायला हवे, असे ते म्हणाले. राज्य प्रशासनातही स्थानिक भाषांचा पुरेपूर वापर व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संसदेतही प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

भाषा संवर्धन आणि वापरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रादेशिक भाषांमधून अधिकाधिक साहित्यनिर्मिती व्हावी, असंही नायडू यावेळी म्हणाले.

यावेळी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते तेलगु कवी डॉ के शिवा रेड्डी यांचा सरस्वती सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

 

 

 

N.Sapre/R.Aghor/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1586575) आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English