संरक्षण मंत्रालय

लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी कर्मचारी समितीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 27 SEP 2019 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2019

 

लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी कर्मचारी समितीचे अध्यक्ष म्हणून मावळते अध्यक्ष हवाई दलप्रमुख बिरेंदर सिंग धनोआ यांच्याकडून पदभार स्वीकारला.

हवाई दल प्रमुख धनोआ यांच्या कार्यकाळात तिन्ही दलांनी अनेक आघाड्यांवर एकत्र येऊन उत्तम कामगिरी बजावली होती.

जनरल बिपिन रावत हे या समितीचे जानेवारी 2017 पासून सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात समितीने परिचालन, प्रशिक्षण आणि प्रशासन यासारख्या विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. या महत्वपूर्ण मुद्यांवर रावत यांची दूरदृष्टी आणि व्यावसायिक ज्ञानाचे मोठे योगदान आहे.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1586500)
Read this release in: English