संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलाचे मिग-21 टाइप-69 प्रशिक्षण विमान कोसळले

प्रविष्टि तिथि: 25 SEP 2019 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019

 

भारतीय हवाई दलाचे मिग-21 टाइप-69 हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे लढाऊ विमान आज सकाळी ग्वालेरजवळ कोसळले. ग्वालेरच्या हवाई दलाच्या तळावरुन या विमानाने उड्डाण केले होते. मात्र खाली उतरत असतांना विमानाला अपघात झाला. विमानातले दोन्ही वैमानिक सुरक्षित असून हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1586141) आगंतुक पटल : 92
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English