जलशक्ती मंत्रालय

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सहाव्या भारत जल सप्ताहाचे उद्‌घाटन


जलाशी संबंधित विविध मुद्दे हाताळण्यासाठी 14 देशांची भारताला मदत- गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 24 SEP 2019 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2019

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सहाव्या भारत जल सप्ताहाचे उद्‌घाटन झाले. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. पाण्याशी संबंधित सर्व महत्वाच्या मुद्यांवर विविध देशात करण्यात आलेल्या उपाययोजना भारताला सांगाव्यात तसेच भारताकडूनही काही उपाययोजनांची माहिती घ्यावी या दृष्टीने 11 देश एकत्र येऊन काम करत आहेत अशी माहिती शेखावत यांनी दिली. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते. पृथ्वी आणि नव्या पिढीप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव भारताला आहे आणि त्या दृष्टीने उदिृष्टे साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. त्या दृष्टीनेच जल संवर्धन आणि इतर मोहिमांची अंमलबजावणी करण्यासाठी जल शक्ती अभियान सुरु करण्यात आले आहे असे ते म्हणाले. ‘जल सहकार्य- 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1585993) Visitor Counter : 170


Read this release in: English