गृह मंत्रालय

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेतर्फे आपत्कालीन परिस्थितीनंतरच्या गरजांवर उद्या कार्यशाळा

Posted On: 22 SEP 2019 7:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019

 

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेतर्फे (एनआयडीएम) उद्या 23 सप्टेंबर 2019 रोजी आपत्कालीन परिस्थितीनंतरच्या गरजांवर नवी दिल्ली येथे एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 

एनआयडीएमने ‘सायक्लॉन रिस्क मेटीगेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘पोस्ट डिजास्टर नीड असेसमेंट’वर एक वैज्ञानिक उपकरण विकसित करण्यासाठी अभ्यास केला आहे. या कार्यशाळेचे लक्ष्य सर्व संबंधितांना या अभ्यासाचे निष्कर्ष कागदपत्र दाखविणे आहे; ज्यामुळे गृह मंत्रालयासाठी अहवाल तयार करताना त्याचा उपयोग संदर्भ म्हणून होईल. कार्यशाळेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत होणारे नुकसान व त्याचे आकलन करताना राज्यांना येणाऱ्या समस्या व मुद्दे यांवर देखील चर्चा होणार आहे. 

या कार्यशाळेसाठी संबंधित केंद्रीय मंत्रालये / विभागाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच राज्य व केंद्र शासित प्रदेशांचे निवासी आयुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन मुख्य सचिव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय कार्यशाळेसाठी यूएनडीपी, जागतिक बँक, एडीबी, जागतिक आरोग्य संघटना, एफएओ, डब्ल्यूएफपी, स्वयंसेवी संस्था आणि बहुपक्षीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित केले गेले आहे.

 

S.Pophale/P.Kor



(Release ID: 1585791) Visitor Counter : 173


Read this release in: English