संरक्षण मंत्रालय
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलाला सुपूर्त
Posted On:
19 SEP 2019 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2019
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी ‘खंदेरी’ भारतीय नौदलाकडे सुपूर्त केली.
पहिली पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलात 6 डिसेंबर 1968 ला दाखल झाली होती. 20 वर्षांच्या सेवेनंतर 18 ऑक्टोबर 1989 ला तिला सेवेतून निरोप देण्यात आला होता.
स्कॉर्पिअन श्रेणीतली पाणबुडी बांधणे एमडीएलसाठी आव्हानात्मक होते. त्यावर मात करुन गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता खंदेरी बांधण्यात आली आहे.
स्कॉर्पिअन श्रेणीतली तिसरी पाणबुडी ‘करंज’च्या सध्या सागरी चाचण्या सुरु आहेत.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1585607)
Visitor Counter : 165