संरक्षण मंत्रालय
भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ
Posted On:
19 SEP 2019 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2019
भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र विनाशक ‘कोरा’, गस्ती नौका सुमेधा, यांच्यासह पी 8 आय विमानाने या सरावात सहभाग घेतला. यांच्यासह आरएसएस टेनाशियस, एचटीएमएस काबुरी यांनी संरक्षण दलाच्या मापदंडात, विमान सुरक्षा आणि संदेशवहन प्रात्यक्षिके केली, ज्यामुळे सागरी आंतकृती कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळाले.
तत्पूर्वी सिटमेक्स-19 मधील बंदर टप्पा पोर्ट ब्लेअर इथे झाला. चर्चासत्र, मैत्रीपूर्ण बास्केटबॉल सामने, खाद्यमहोत्सव यांचे आयोजन यात करण्यात आले होते.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1585546)
Visitor Counter : 185