आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 47 लाख जणांना लाभ-डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 17 SEP 2019 6:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2019

 

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी सुमारे 47 लाख व्यक्तींना उपचार उपलब्ध होऊ शकले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 21 हजारांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली.

योजनांबाबत अधिक जागृती करण्यासाठी आयुष्मान भारत पंधरवड्याची घोषणा करताना ते बोलत होते. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या वर्षपूर्तीबद्दल 15 ते 30 सप्टेंबर हा पंधरवडा आयुष्मान भारत पंधरवडा साजरा होत आहे.

14 एप्रिल 2018 रोजी आयुष्मान योजनेचा तर 23 सप्टेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या प्रारंभ झाला.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1585341) Visitor Counter : 115


Read this release in: English