श्रम आणि रोजगार मंत्रालय

संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्रदान

Posted On: 17 SEP 2019 5:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2019

 

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात, वर्ष 2017 चे विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेसाठी मुंबईस्थित फॅक्टरी ॲडव्हाईस सर्व्हिस ॲण्ड लेबर इन्स्टिट्यूटस् महासंचालनालय करत असलेल्या कामाचे गंगवार यांनी कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्येही हे महासंचालनालय आणि खाण महासंचालनालयाची कार्यालये उघडण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला असल्याचे गंगवार यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर आणि लेहमध्ये कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी ईपीएफओ कार्यालयही उघडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1585314) Visitor Counter : 115
Read this release in: English