सांस्कृतिक मंत्रालय

नेहरू विज्ञान केंद्रात 20 सप्टेंबर रोजी ‘स्पार्कलिंग हाय व्होल्टेज डेमॉन्स्ट्रेशन’

Posted On: 17 SEP 2019 4:35PM by PIB Mumbai

 

मुंबई, 17 सप्टेंबर 2019

 

मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राने ‘स्पार्कलिंग हाय व्होल्टेज डेमॉन्स्ट्रेशन’ विकसित केले आहे. याचे उद्‌घाटन नेहरू विज्ञान केंद्र, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे 20 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 2.30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम नेहरू विज्ञान केंद्र, एनसीएमएम, डॉ. ई. मोझेस मार्ग, वरळी, मुंबई-18 येथे होणार आहे.

नेहरू विज्ञान केंद्राच्या कार्यकारी समितीचे प्रमुख आणि गांधीनंजर (गुजरात) इथल्या नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे महासंचालक डॉ. वसंत शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक संख्येने विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1585305) Visitor Counter : 83


Read this release in: English