महिला आणि बालविकास मंत्रालय

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

प्रविष्टि तिथि: 12 SEP 2019 2:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2019

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

गुणवान मुले, व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येते. बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येतात.

यासंदर्भात अधिक माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1584827) आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English