माहिती आणि प्रसारण मंत्रालय

बॉलिवूडपेक्षा भारतीय सिनेमा आणखी खूप काही आहे; वेगवेगळ्या भाषा, शैली आणि प्रादेशिक स्वाद त्याच्या समृद्धीची भर घालतात - कॅमेरून बेली, कलात्मक दिग्दर्शक, टीआयएफएफ


टीआयएफएफ येथे इंडिया ब्रेकफास्ट-नेटवर्किंग सत्राचे आयोजन

भारत आणि कॅनडा सहनिर्मितीसाठी कृतीशील उपाययोजना करणार

सिनेमे बनविण्यासाठी भारताने जागतिक पातळीवर ऑल इन वन डेस्टिनेशन म्हणून सादर केले

Posted On: 10 SEP 2019 6:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2019

 

टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (टीआयएफएफ) २०१९ मधील सहभागाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने  ‘इंडिया ब्रेकफास्ट नेटवर्किंग’ सत्राचे आयोजन केले होते. अपूर्व श्रीवास्तव, भारताचे महावाणिज्य दूत , टोरोंटो , टीआयएफएफचे सह-प्रमुख आणि कलात्मक दिग्दर्शक  कॅमेरून बेली आणि भारतीय शिष्टमंडळाने या सत्रात सहभागीं झालेल्यांशी संवाद साधला.

 

इंडिया ब्रेकफास्ट नेटवर्किंग सत्र

भारतीय प्रतिनिधीमंडळाने उपस्थितांना भारतात चित्रीकरणासंदर्भात मैत्रीपूर्ण  धोरणात्मक निर्णय आणि रुपरेषेची तसेच चित्रपट सुविधा कार्यालयात एकल खिडकी यंत्रणेद्वारे चित्रीकरणासाठी परवानगी मिळविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. शिष्टमंडळाने इफ्फि  2019 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी संभाव्य सहकार्य आणि भागीदारीबाबत चर्चा केली आणि या नोव्हेंबरमध्ये जगाला गोव्यातील सोहळ्यात सहभागी  होण्यासाठी आमंत्रित केले.

याप्रसंगी बोलताना  कॅमेरून बेली म्हणाले की भारतीय सिनेमा आणि टीआयएफएफ यांच्यात खूप मजबूत संबंध आहे. भारतीय सिनेमाची व्याप्ती बॉलिवूडपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वेगवेगळ्या शैली, भाषा आणि प्रादेशिक स्वाद असलेल्या भारतीय सिनेमाच्या वैभवाबाबत ते म्हणाले की,  भारतात निर्मिती होत असलेल्या चित्रपटातील संगीत, ऍनिमेशन , गंभीर नाट्य आणि  विनोद यात ते प्रतिबिंबित होते. जगात असा कोणताही देश नाही जे भारतासारखे चित्रपट बनवतात.

या सत्राला  आघाडीच्या महोत्सवांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटनाचे प्रतिनिधी, चित्रपट संस्था आणि प्रॉडक्शन हाऊस,  कॅरेन थॉर्न-स्टोन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ओंटारियो क्रिएट्स ,रीमा दास, निर्माता / दिग्दर्शक; रॉजर नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, लायनहार्ट प्रॉडक्शन हाऊस; अरविंद विज, संचालक, डेलॉइट कॅनडा इंडिया सर्व्हिसेस ग्रुप;  क्रेग प्रॅटर, अध्यक्ष, हार्टलँड फिल्म फेस्टिव्हल; हन्ना फिशर, जेष्ठ प्रोग्रामर, हार्टलँड फिल्म फेस्टिव्हल; थॉमस रॅडो, जिब्राल्टर आणि पाल्मे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी; हायजु  किम, आंतरराष्ट्रीय संबंध टीम KOFIC (कोरियन फिल्म कौन्सिल). सर्व संबंधितांनी भारताबरोबर व्यवसाय  करण्यास उत्सुकता दर्शविली.

 

कॅनडाच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी संवाद

सर्वांपर्यंत पोहचण्याच्या धोरणाचा भाग म्हणून  भारतीय प्रतिनिधीमंडळाने कॅनडा सरकारच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. यामध्ये कॅरेन थॉर्ने-स्टोन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ओंटारियो क्रिएट्स; प्रेम गिल, सीईओ, क्रिएटिव्ह बीसी;  फ्रान्सिस्का एसीनेली ,संचालक, प्रमोशन आणि कम्युनिकेशन , टेलिफिल्म कॅनडा; जोसेलीन गिरार्ड, दिग्दर्शक, चित्रपट आणि व्हिडिओ धोरण आणि कार्यक्रम सांस्कृतिक उद्योग, कॅनेडियन हेरिटेज; मेलिसा आमेर, उपसंचालक, कॅनडा मीडिया फंड, टेलीफिल्म कॅनडा यांचा समावेश होता.

भारत सरकारने सह-निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांविषयी कांडा सरकारला माहिती देण्यात आली. एफएफओ, इंडिया या संस्थेने भारतात चित्रीकरणासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना परवानगी तसेच देशातील चित्रपटाशी संबंधित माहितीचे एकत्रित स्त्रोत यासाठी एकल खिडकी सुविधा आणि मंजुरी यंत्रणा म्हणून काम करण्यासाठीचे उपाय तसेच चित्रीकरण मंजुरी प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नोडल अधिकारी व्यवस्था उभारणे, मान्यताप्राप्त भारतीय निर्मात्यांची यादी तयार करणे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी परिषदा/कार्यशाळा आयोजित करणे आदींची माहिती दिली.

 

भारत - चित्रपट बनवण्याकरिता ऑल इन वन डेस्टिनेशन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आयोग आणि सरकारी संस्था यांनी भारत आणि इफ्फि २०१९ मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच धोरणांच्या रुपरेषेत  नुकत्याच केलेल्या बदलांचे कौतुक केले. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील आकर्षक विकासाच्या संधींचे हे प्रतीक आहे ज्यातून ‘जागतिक स्तरावर’ चित्रपट बनवण्यासाठी 'ऑल इन वन डेस्टिनेशन ' म्हणून भारताकडे पाहिले जात आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1584773) Visitor Counter : 83


Read this release in: English