पंतप्रधान कार्यालय

किसान मान धन योजनेचा 12 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ


रांची येथे झारखंडच्या नव्या विधानसभा इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होणार

Posted On: 09 SEP 2019 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 सप्टेंबरला झारखंडमधल्या रांची येथे किसान मान धन योजनेचा प्रारंभ करणार आहेत.

5 कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षापासून दरमहा किमान तीन हजार रुपये पेन्शन या योजनेद्वारे मिळणार आहे.

येत्या तीन वर्षासाठी या योजनेचा 10,774 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या 18 ते 40 वर्षे वयोगटातले छोटे आणि मध्यम शेतकरी या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठीच्या 400 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्‌घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

झारखंड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार असून रांची येथे नव्या सचिवालय इमारतीचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते होईल.

साहेबगंज इथल्या मल्टी मोडल टर्मिनलचे उद्‌घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1584585) Visitor Counter : 164


Read this release in: English