महिला आणि बालविकास मंत्रालय
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या हस्ते गौरव
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2019 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2019
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्या गौरव करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुष जन्मदर गुणोत्तर सुधारण्यासाठी जनजागृतीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी 5 राज्यांचे प्रधान सचिव/आयुक्त, नऊ राज्यातल्या 10 जिल्ह्यातले जिल्हा दंडाधिकारी/उपायुक्त यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जनजागृतीसाठी उत्तम काम करणाऱ्या 8 राज्यातल्या 10 आणखी जिल्ह्यातल्या जिल्हा दंडाधिकारी/उपायुक्तांनाही गौरवण्यात येणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1584244)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English