माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऑनलाइन कन्टेन्टला प्रमाणपत्र देण्याबाबत मागविल्यात सूचना


इफ्फि-2019 खूप खास असेल; इफ्फि 2019 ची संकल्पना 'एक भारत श्रेष्ठ भारत' : इफ्फिच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माहिती प्रसारण मंत्र्यांनी दिली माहिती

सीबीएफसीच्या प्रमाणपत्र डिझाइनचे जावडेकरांच्या हस्ते अनावरण

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या नवीन लोगो आणि प्रमाणपत्राचे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 31 AUG 2019 11:43PM by PIB Mumbai

मुंबई, 31 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या नवीन चिन्हाचे आणि प्रमाणपत्राचे उद्घाटन केले याप्रसंगी भारतातील चित्रपट उद्योग सृष्टीच्या दिग्गज आणि सी.बी.एफ.सी मुंबईचे सदस्य यांच्यात आज विशेष चर्चा झाली.

या कार्यक्रमाला कंगना रणावत, संजय खान, सतीश कौशिक, मधुर भांडारकर, विधू विनोद चोप्रा, बोनी कपूर, रमेश सिप्पी, अनुपम चोप्रा, सुभाष घई, सुधीर मिश्रा, अतुल कसबेकर, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, प्रल्हाद कक्कर, किरण शांताराम, कुणाल कोहली इत्यादी चित्रपट सृष्टीतील मंडळी उपस्थित होती तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे सी.बी.एफ.सी अध्यक्ष प्रसून जोशी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, नवीन प्रमाणपत्राच्या डिझाईन मध्ये क्यूआर कोड लागू करणे हे बदलत्या डिजिटल जगाशी सुसंगत आहे. ते पुढे म्हणाले की, यामुळे अधिक पारदर्शकता आणि चित्रपट निर्मात्यांना अधिक समृद्धपणे माहिती प्रदान करता येईल सी.बी.एफ.सी आपले कार्य प्रभावीपणे पार पडत असल्याबद्दल त्यांनी सी.बी.एफ.सी अभिनंदन केले.

केबल टेलिव्हिजन संदर्भात बोलताना जावडेकर म्हणाले की,  केबल टेलिव्हिजन त्यानंतर डीटीएच यांची ओळख झाल्यानंतर लोकांना फारच कमी किमतीमध्ये टीव्ही चॅनल्स उपलब्ध झालेत, परंतु हे ट्राई (TRAI) ने दिलेल्या आदेशानंतर शक्य झाले. आजकाल, सोशल मीडियामुळे फक्त एक-दोन कार्यक्रमांमुळे एखादा चित्रपट यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट होत.”

आधुनिक जीवनात करमणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन  जावडेकर यांनी सर्व टीव्ही निर्मात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले जेणेकरुन दृष्टिहीन (दिव्यांग) लोकांना चित्रपट चांगले समजू शकतील. ते पुढे म्हणाले कि, अशा तंत्रज्ञान चा वापर करून केवळ प्रति चित्रपट एक किंवा दोन लाख रुपये खर्चात तयार करता येतील. त्यांनी खासगी वृत्तवाहिन्यांनीही कर्णबधिर दिव्यांगसाठी आठवड्यातून किमान एक बुलेटिन चालू करण्याची विनंती केली.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचे आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असेल त्यामुळे ते विशेष असेल. याबाबत बोलताना मंत्री म्हणाले : “IFFI 2019ची संकल्पना 'एक भारत श्रेष्ठ भारत' असून,  उद्घाटन व समारोप समारंभात या संकल्पनेचे प्रतिबिंबित उमटेल. या महोत्सवास सर्वांनी यावे व उपस्थित रहावे असे मी आवाहन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते चित्रपट हा हि उद्योग आहे; आम्ही चित्रपट व्यापार परिषद आयोजित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जे चित्रपटांच्या व्यवसायातील समस्यांकडे लक्ष देऊन पाठपुरावा करतील. चित्रपट व्यापार परिषद मुंबईत आयोजित करण्याचे ठरविले असून ते व्यवसाय, जाहिरात तंत्रज्ञान प्रसार आणि निर्यातीच्या पदोन्नतीकडे लक्ष देईल.

जावडेकर यांनी सांगितले कि, चलनशक्ती रोखण्यासाठी सरकार सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करणार आहे. “आम्ही आधी कॉपीराइट अॅक्ट बदलून कलाकारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, आता आम्ही सिनेमॅटोग्राफ कायदा बदलत आहोत जेणेकरून पायरेसीला आळा बसेल.” ऑनलाइन कन्टेन्टला प्रमाणपत्र देण्याबाबत प्रेक्षक व इतर भागधारकांकडून सूचना मागविण्यात येत आहे.

नव्या डिझाइनवर भाष्य करताना  सीबीएफसीचे अध्यक्ष, प्रसून जोशी म्हणाले कि, “माझा विश्वास आहे कि नवीन डिझाइनमुळे समकालीन डिजिटल जगाचे प्रतिबिंबित होईल. तंत्रज्ञानाने आपल्या कार्य प्रक्रियेत सहजतेने उपयोग केला पाहिजे. डिझाइन बदल हा दिखावा नाही; तो अत्यंत कार्यशील आहे आणि सीबीएफसीचा सकारात्मक मूल्य वर्धित दृष्टीकोन अधोरेखित करतो.”

प्रसून जोशी यांनी उपस्थितांना क्यू आर कोड संदर्भात विस्तृत माहिती दिली.

 

                                                                                *****

B. Gokhale/D.Rane

 



(Release ID: 1583774) Visitor Counter : 221


Read this release in: English