पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांनी पद त्याग

Posted On: 30 AUG 2019 7:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पदत्यागाचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी त्यांना दोन आठवडे कार्यकाळ वाढविण्याची विनंती केली होती .

पंतप्रधानांनी पी एम कार्यालयाचे विशेष अधिकारी म्हणून पी. के. सिन्हा सेवानिवृत्त (भारतीय प्रशासन सेवा यु पी :७७ च्या तुकडीचे )यांची नियुक्ती केली आहे.

एका निवेदनात नृपेंद्र मिश्रा म्हणाले :

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सेवा करणे हा एक विशेषाधिकार आहे. या संधीबद्दल आणि  त्यांनी  माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे  मनापासून आभार मानतो.

या समाधानकारक प्रवासासाठी मी माझा प्रत्येक तास कामासाठी खर्ची केला आहे आणि त्याचा आनंद घेतला आहे. यानंतरचा कार्यकाळ मी सार्वजनिक कार्यांसाठी आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित करीन. यासाठी आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.

 मी, सरकारी, बिन सरकारी सहकाऱ्यांचे, मित्रांचे आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  यांनी स्वतःच्या नेतृत्वाने देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेले आहे.

 

B.Gokhale/P.Kor


(Release ID: 1583742) अभ्यागत कक्ष : 343
Read this releasein: English