उपराष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रीय सुरक्षेप्रति कायम दक्ष राहायला हवे – उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 29 AUG 2019 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2019

 

विकासासाठी सुरक्षित वातावरण नितांत आवश्यक असते. राष्ट्रीय सुरक्षेप्रति आपण कायम दक्ष राहायला हवे, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपतींनी आज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथे सोसायटी फॉर ॲप्लाइड माइक्रोवेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (समीर)च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (इएमपी) आणि ई एमआय एककांना भेट दिली.

मानव अथवा निसर्गनिर्मिती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पंदनांमुळे (इएमपी) भौगोलिक क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता असते. राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांना याचा फटका बसण्याची, जागतिक स्तरावर वाणिज्य आणि स्थैर्य यांवर परिणाम करण्याची ताकद त्यात असते. या पार्श्वभूमीवर इएमपी रोधक पायाभूत सुविधा आणि संरक्षणा यंत्रणा विकसित करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

 

उपराष्ट्रपतींच्या मूळ भाषणासाठी इथे क्लिक करा

 

R.Tidke/S.Kakade/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1583521) आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English