माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कम्युनिटी रेडिओ चालवण्यासाठी 89.6 आणि 90.0 मेगाहर्टझ या दोन अतिरिक्त लहरी देण्यास दूरसंचार विभागाची सहमती
कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीच्या जाहिरात दरात दोन महिन्यात सुधारणा करण्यात येणार – अमित खरे
Posted On:
29 AUG 2019 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2019
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या 7व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचा समारोप आज झाला. कम्युनिटी रेडिओ चालवण्यासाठी 89.6 आणि 90.30 मेगाहर्टझ या दोन अतिरिक्त लहरी देण्यास दूरसंचार विभागाने सहमती दर्शवली असल्याचे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी यावेळी सांगितले.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी अलिकडे करण्यात आलेल्या जाहिरात दराच्या वाढीच्या धर्तीवर ब्यूरो ऑफ आऊटरिच ॲण्ड कम्युनिकेशनकडून दोन महिन्यात कम्युनिटी रेडिओसाठीच्या जाहिरात दरात सुधारणा करण्यात येईल, असेही खरे यांनी जाहीर केले.
S.Tupe/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1583496)
Visitor Counter : 128