पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

विविध राज्यांना वनीकरणासाठी केंद्राकडून 47,436 कोटी रुपये


एनडीसी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरीता निधी वापरण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे राज्यांना आवाहन

Posted On: 29 AUG 2019 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2019

 

देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज विविध राज्यांना 47,436 कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित केला. नवी दिल्लीत आज राज्यांच्या वनमंत्र्यांची बैठक झाली.

HRB_9323.JPG

वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (एनडीसी) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, वनीकरणाकरिता हा निधी वापरण्याचे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले.

HRB_9320.JPG

कॅम्पा अर्थात क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणांतर्गत हा निधी दिला आहे. राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यावेळी उपस्थित होते. क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 मध्ये या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Fotor_156705842093086.jpg

राज्यांना देण्यात आलेल्या कॅम्पा निधी संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:

 

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1583493) Visitor Counter : 276


Read this release in: English