नौवहन मंत्रालय

जगातील पहिल्या मौद्रिक बायोमेट्रिक डेटा आधारित खलाशी ओळखपत्राची भारताकडून सुरुवात

प्रविष्टि तिथि: 28 AUG 2019 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019

 

खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे या प्रकल्पाची सुरुवात झाली. पाच भारतीय खलाशांना त्यांच्या हस्ते नवी ओळखपत्र देण्यात आली.

नौवहन क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, या क्षेत्रात रोजगारनिर्मिती वाढत आहे, असे मांडवीय यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय नौवहन उद्योगात भारतीय खलाशांची संख्या वाढत आहे. भारतीय तसेच परदेशी नौकांवरील भारतीय खलाशांची संख्या 2017 मध्ये 1,54,349 होती. त्यात 35 टक्के वाढ होऊन यावर्षी ती 2,08,799 वर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नव्या ओळखपत्रामुळे आपल्या खलाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे, तसेच नोकरी मिळवणेही सुलभ होणार आहे.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

To see the presentation made on the occasion please click the link : PPT Seafarers 28.8.19


(रिलीज़ आईडी: 1583271) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English