जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती अभियानात 3.7 कोटींहून अधिक नागरिक सहभागी
Posted On:
27 AUG 2019 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2019
जलसंवर्धनासंदर्भात पारंपरिक ज्ञान अवगत करुन त्यात नागरिकांच्या मदतीने सुधारणा करा, तसेच आधुनिक जलतंत्रज्ञानाची माहिती घ्या, असे आवाहन जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अधिकाऱ्यांना केले आहे. जलशक्ती अभियानांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचा, विशेषत: देशातील 256 सर्वाधिक जलसंकटग्रस्त जिल्ह्यांच्या दुसऱ्या क्षेत्रभेटीचा आढावा घेण्यात आला. यावेळी 1100 हून अधिक केंद्र सरकारी अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यात जलशक्ती अभियानात 3.7 कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले असून, या अभियानाचे रुपांतर आता जलआंदोलनात झाले आहे. 256 जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक स्थानिक जलसंवर्धन पायाभूत सुविधा देण्यात आल्या. यात 2.73 लाख पाणीबचत आणि वर्षा जलसंचयना संदर्भात आहे. तर 44 हजारांहून अधिक पारंपरिक जलसाठ्यांचा कायाकल्प घडवण्यात आला असून, सुमारे 1.5 लाख पुनर्वापर आणि पुनर्भरणाबाबत आहेत. 1.23 लाख अवर्षणग्रस्त विकास प्रकल्पांचाही यात समावेश आहे. वनीकरणासाठी 12.3 कोटी रोपे लावण्यात आली.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1583135)
Visitor Counter : 96