युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 जाहीर


जलतरणपटू प्रभात कोळीचा समावेश

Posted On: 27 AUG 2019 2:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2019

 

तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आले असून, या पुरस्काराचे भू, जल, वायु साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते. वांगचूक शेर्पा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जलतरणपटू प्रभात राजू कोळी, गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, माणिकंदन के आणि हवाई साहसपटू रामेश्वर जांग्रा यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 ला होणाऱ्या कार्यक्रमात इतर क्रीडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1583134) Visitor Counter : 186


Read this release in: English