माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दिल्लीत 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान 7वे कम्युनिटी रेडिओ संमेलन
प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार होणार प्रदान
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2019 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2019
नवी दिल्लीतल्या डॉ. बी.आर. आंबेडकर भवन येथे उद्यापासून 29 ऑगस्टपर्यंत 7वे कम्युनिटी रेडिओ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या संमेलनाचे आयोजन केले असून, देशभरातली सर्व कम्युनिटी रेडिओ यात सहभागी होणार आहेत.
संमेलनाची या वर्षीची संकल्पना शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी कम्युनिटी रेडिओ अशी आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी अधिक चांगल्या प्रकारे कार्यक्रमांच्या शक्यता आणि अनुभव याबाबत कम्युनिटी रेडिओ केंद्रांचे प्रतिनिधी या संमेलनात चर्चा करतील.
जलशक्ती अभियानासारखे सरकारचे उपक्रम आणि आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न याबाबतही चर्चा होईल.
संमेलनात 28 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान केले जातील.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1583068)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English