ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी तांदुळ पोषण संवर्धन प्रायोगिक योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या समवेत केली चर्चा

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2019 6:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2019

 

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. राजीव कुमार यांनी तांदुळ पोषण संवर्धन प्रायोगिक योजनेविषयी तसेच योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातल्या विविध मुद्यांबाबत पासवान आणि मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

भारतातल्या कुपोषण समस्येचा प्रभावी निपटारा करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने या योजनेचा संपूर्ण देशासाठी पथदर्शी आराखडा तयार करावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1582779) आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English