वित्त आयोग
15व्या वित्त आयोगाची आरोग्य क्षेत्राबाबत डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा
Posted On:
23 AUG 2019 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2019
एन.के.सिंग यांच्या अध्यक्षतेखालच्या 15 व्या वित्त आयोगाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि या मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. आरोग्य क्षेत्रावरच्या उच्चस्तरीय गटाचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रासाठी नियामक चौकट, आरोग्य क्षेत्रासाठी मानव संसाधन, सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च, सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदान करणारी यंत्रणा बळकट करणे, आयुषसमावेशक दृष्टीकोन या पैलूंबाबतच्या शिफारसी उच्चस्तरीय गटाने यावेळी सादर केल्या.
आरोग्य सचिव, प्रिती सुदान यांनी वित्त आयोगाला, आरोग्य मंत्रालयाचे निवेदन सादर केले. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017, उद्दिष्टे, आवश्यक संसाधने, क्षेत्रनिहाय अनुदानासाठी प्रस्ताव, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठीच्या आवश्यकता यांचा यात समावेश आहे.
सर्व शिफारसींचा बारकाईने विचार केल्यानंतर सरकारला आपला अहवाल सादर करू असे आश्वासन आयोगाने दिले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1582752)
Visitor Counter : 118