पंतप्रधान कार्यालय

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 19 AUG 2019 10:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2019

 

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी 130 कोटी भारतीयांच्या वतीने अफगाणिस्तानच्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अफगाणिस्‍तानच्या स्वातंत्र्याला आज 100 वर्ष पूर्ण झाली.

यावेळी करझई यांनी भारताने अफगाणिस्तानला दिलेल्या सर्वांगीण सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांविषयी आनंद व्यक्त केला.

अफगाणिस्तानात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करून एकात्मिक स्वतंत्र आणि लोकशाही राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची निर्मिती करण्यास भारताचे कायम सहकार्य असेल, असा पुनरूच्चार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1582424) Visitor Counter : 75


Read this release in: English