संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली
Posted On:
16 AUG 2019 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2019
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी केली होती. वाजपेयींना पोखरण येथे आदरांजली वाहण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असल्याचे राजनाथ सिंह यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
‘भारताला अण्वस्त्रधारी देश बनवण्याचा निर्धार अटलजींनी पोखरण येथे केला होता आणि ‘नो फर्स्ट यूज’ तत्वाचे कसोशीने पालनही केले. मात्र भविष्यात काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असेल’ असे ते म्हणाले.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1582181)
Visitor Counter : 200