पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

एकदा वापर होणाऱ्या प्लॅस्टिकपासून भारताला मुक्त करण्यासाठी महा अभियान राबवणार-प्रकाश जावडेकर

Posted On: 15 AUG 2019 7:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2019

 

एकदा वापर होणाऱ्या प्लॅस्टिकपासून भारताला मुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात केले असून त्याला प्रतिसाद म्हणून सर्व संबंधितांना सहभागी करून घेणारे महा जन अभियान सुरू केले जाईल असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. जावडेकर ब्रिक्स आणि बेसिक देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी सध्या ब्राझीलमध्ये आहेत. यासंदर्भात राज्य सरकार तसेच सर्व संबंधितांबरोबर बैठका घेतल्या जातील आणि ही एक लोक चळवळ बनवण्यासाठी ठोक आराखडा तयार केला जाईल असे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला मात्र पुढील पाच वर्षात जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करू, असा संदेश पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दिल्याचे ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला. ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1582170) Visitor Counter : 110


Read this release in: English