पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

निर्धारित योगदानांचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबात भारताचे जगासमोर उदाहरण

Posted On: 16 AUG 2019 5:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2019

 

शहरांमधील जीवनमान सुधारण्यासाठी शहरी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे महत्व नमूद करताना ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या बहुआयामी पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. ब्राझीलमधल्या साओ पावलो येथे पाचव्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा आणि घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी पर्यावरणाबाबत ब्रिक्सच्या संयुक्त कृती गटाची दोन दिवसीय बैठक पार पडली.  

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशासाठी निर्धारित योगदानाचे उद्दिष्ट साध्य करण्यात भारताने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत उत्तम कामगिरी करत आहे. भारताने ऊर्जेच्या वापरात 25 टक्के घट केली आहे तर 78 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन केले आहे. त्याचबरोबर वन क्षेत्र सुमारे 15 हजार चौ. कि.मी.ने वाढवले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहकार्य आणि विकासासाठी ब्रिक्स हा सर्व पाच देशांसाठी उत्तम मंच आहे. पर्यावरणाचे रक्षण करतांनाच विकास सुनिश्चित करण्यात या देशांच्या अनुभवांची नक्कीच मदत होईल, अशी आशा जावडेकरांनी व्यक्त केली. भारताने निर्धारित योगदानाचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत जगासमोर उदाहरण घालून दिल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

ब्रिक्स देशांच्या उपक्रमांची प्रशंसा करताना जावडेकरांनी ब्रिक्स सहकार्याला भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ब्रिक्स देशांच्या मंत्र्यांनी विकसित देशांना पॅरिस करार आणि क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत आपली बांधिलकी पूर्ण करण्याचे आवाहन केले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1582167) Visitor Counter : 121


Read this release in: English