संरक्षण मंत्रालय
सशस्त्र आणि निमलष्करी दलाच्या जवानांना 132 शौर्य पुरस्कार तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना 8 तटरक्षक पदक प्रदान करायला राष्ट्रपतींची मंजुरी
Posted On:
14 AUG 2019 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दल आणि निम लष्करी दलाच्या जवानांना 132 शौर्य पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली. यामधून दोन किर्ती चक्र, एक वीर चक्र, 14 शौर्य चक्र, आठ बार टू सेनापदकं, 90 सेना पदकं, पाच नौसेना पदकं, सात वायू सेना पदकं आणि पाच युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींनी तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही आठ पदकं जाहीर केली आहेत. यामध्ये एक राष्ट्रपती तटरक्षक पदक, पाच तटरक्षक पदकं (शौर्य) आणि दोन तटरक्षक पदकं (उत्तम सेवेसाठी) यांचा समावेश आहे.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(Release ID: 1582004)
Visitor Counter : 198