गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिन 2019 निमित्त अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

Posted On: 14 AUG 2019 1:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त यावर्षी 56 कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदके जाहीर झाली आहेत. यापैकी एकाला राष्ट्रपती अग्निशमन शौर्यपदक दिले जाणार आहे. 8 कर्मचाऱ्यांना अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर 47 कर्मचाऱ्यांना उत्तम सेवेसाठी अग्निशमन सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे.

44 कर्मचाऱ्यांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदके जाहीर झाली आहेत. 8 कर्मचाऱ्यांना अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर 36 कर्मचाऱ्यांना उत्तम सेवेसाठी होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक जाहीर झाले आहे.

अग्निशमन सेवा पदके आणि होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादीसाठी येथे क्लिक करा...

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1581932) Visitor Counter : 88


Read this release in: English