गृह मंत्रालय

उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल गृहमंत्रालयाकडून पोलिसांचा विशेष पदकाने गौरव

Posted On: 13 AUG 2019 3:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2019

 

उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 96 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला.  पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.

यावर्षी गौरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये 15 सीबीआयचे अधिकारी तर 11 महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आहेत. यात 13 महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

 

S.Tupe/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1581839) Visitor Counter : 95


Read this release in: English