माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्यातर्फे गांधी जीवनावर आधारित अल्बम राष्ट्रपतींना भेट


राष्ट्रपतींतर्फे सरकारी कर्मचाऱ्यांना महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Posted On: 09 AUG 2019 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वर्धापनदिनी ‘ महात्मा गांधी/चित्रमय जीवनगाथा’ या पुस्तकाची प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती भवनात भेट दिली.  या पुस्तकात 550 फोटो आणि महात्मा गांधीजींच्या जीवनावरील कथांचा सहभाग आहे. हे पुस्तक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

पुस्तकासंदर्भात:-

महात्मा गांधीजींचे बालपण ते शिक्षण, दक्षिण आफ्रिका दौरा, विविध चळवळींमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतात त्यांनी घेतलेला सहभाग आणि कवितांचा समावेश आहे. 20 व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे ते मुख्य शिल्पकार होते.

पहिल्यांदाच हिंदी भाषेमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून इंग्रजी आवृत्ती 1954 ला प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तकातील सर्व फोटोग्राफ्स जानेवारी 1949 मध्ये राजघाट येथील सर्वोदय दिवस प्रदर्शनीमधून घेतले आहेत. गांधीजींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती.

प्रकाश जावडेकर यांनी  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे # गांधी 150 साठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले.

प्रकाशन विभागाच्या चमूने घेतली राष्ट्रपतींची भेट-

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी श्रम घेणाऱ्या प्रकाशन विभागाच्या चमूची ओळख राष्ट्रपतींना करुन दिली. यामध्ये प्रधान महासंचालक डॉ. साधना राऊत, संचालक राजेंद्र भट, संयुक्त संचालक व्ही.के.मीना, डिझायनर नीरज सहाय्य यांचा समावेश होता.

   

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1581655) Visitor Counter : 292


Read this release in: English