आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

सरकारने विद्यमान नवी दिल्ली -हावडा मार्गावरच्या (कानपूर- लखनौसहित) गाड्यांचा वेग वाढवून 160 किलामीटर प्रतितास करण्याच्या योजनेला मान्यता


दिल्ली -हावडा विभागामध्ये वेग वाढवून 160 किलोमीटर प्रतितास केल्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेगामध्ये 60 टक्के वाढ होणार आणि 2022-23 पर्यंत मालवाहू गाड्यांच्या वेगात सरासरी दुपटीने वाढ होणार

नवी दिल्ली -हावडा दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी पाच तासांनी कमी होणार आता हा रात्रभराचा प्रवास होणार

निम्न -वेगवान गाड्या आपल्या पूर्ण क्षमेतचा वापर करून 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार

हा मार्ग एकूण 1525 किलोमीटर लांबीचा आहे. तो पाच राज्यांमधून (दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तसेच पश्चिम बंगाल ) जातो

या प्रकल्पामुळे पूर्ण क्षमतेचा वापर, वेग त्याचबरोबर सुरक्षेमध्ये वृद्धी होवू शकणार

या संपूर्ण प्रकल्पाचा समग्र-सर्वंकष विचार करून तो एकाच संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त अंदाजपत्रकीय तरतूद करताना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून (ईआरबी-आयएफ)निधी उपलब्ध करण्यात येणार

Posted On: 05 AUG 2019 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2019

 

सरकारने विद्यमान नवी दिल्ली -हावडा मार्गावरच्या (कानपूर- लखनौसहित) गाड्यांचा वेग वाढवून 160 किलामीटर प्रतितास करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या कामासाठी अंदाजे 6,685 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पामुळे रेल्वेच्या साधन सामुग्रीच्या पूर्ण क्षमतेचा वापर होणार आहे. वेगवान प्रवास होणार आहे त्याचबरोबर सुरक्षेमध्ये वृद्धी होवू शकणार आहे.

हा मार्ग एकूण 1525 किलोमीटर लांबीचा आहे. तो पाच राज्यांमधून (दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तसेच पश्चिम बंगाल ) जातो. या नवीन प्रकल्पामुळे नवी दिल्ली -हावडा दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी पाच तासांनी कमी होणार आता हा रात्रभराचा प्रवास होणार आहे. दिल्ली -हावडा मार्गावरा कमाल वेगानं गाड्या धावू लागल्यानंतर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या सारख्या अर्ध-उच्चवेगाच्या गाड्यांचा वेग आहे त्यापेक्षाही वाढणार आहे. या गाड्यांचा पूर्ण क्षमतेचा वापर होणार आहे. वेगवान प्रवास होणार आहे त्याचबरोबर सुरक्षेमध्ये वृद्धी होवू शकणार आहे. या वेगवान गाड्यांना अनुकूल असणाऱ्या एलएचबी बोगींची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच वेगवान गाडीसाठी आवश्यक असणा-या तांत्रिक बाबींची पूर्तताही या योजनेत करण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाड्यांचा वेग वाढवणारी योजना आगामी चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकल्पाचा समग्र विचार करून तो एकाच संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त अंदाजपत्रकीय तरतूद करताना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून (ईआरबी-आयएफ)निधी उपलब्ध करण्यात येणार.

या योजनेचे कार्य पूर्ण करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पामुळे 3.6 कोटींपेक्षा जास्त कार्य दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे. यामुळे आर्थिक उलाढाली वाढण्यास मदत हाईल. राज्यांच्या विकासाला वेग येईल.  तसेच प्रवासी क्षमतेमध्ये 30-35 टक्के वाढ होणार आहे. भारतीय रेल्वे संपूर्ण चतुर्भुज आणि कोणीय प्रकल्प पूर्ण करण्याचे काम करत आहे. यामध्ये भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा विचार केला तर या प्रकल्पाचा 16 टक्के भाग आहे. परंतु  प्रकल्पामध्ये एकूण प्रवासी संख्येचा विचार करता ही टक्केवारी 52 आहे आणि मालवाहूची टक्केवारी 58 आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar 

 


(Release ID: 1581533) Visitor Counter : 154
Read this release in: English