अंतराळ विभाग
अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी इस्रोची विक्रम साराभाई पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा
Posted On:
07 AUG 2019 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2019
भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो दोन श्रेणींमध्ये पत्रकारिता पुरस्कार देणार आहे.
अंतराळ विज्ञान, उपयोजन आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सक्रीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी इस्रोने विक्रम साराभाई अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.
पत्रकारितेमध्ये चांगला अनुभव असलेल्या सर्व भारतीयांसाठी नामांकने खुली आहेत. 2019 ते 2020 या वर्षात प्रसिद्ध झालेले लेख या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातील असे इस्रोने सांगितले आहे.
दोन श्रेणीतल्या या पुरस्कारांपैकी पहिल्या श्रेणीत रुपये 5 लाख रोख, पदक आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून मुद्रित प्रसार माध्यमातील दोन पत्रकार किंवा मुक्त पत्रकारांना हे पुरस्कार दिले जातील.
पुरस्कारासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पत्रकारांमधून हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमधून नियतकालिके, विज्ञान पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, यशोगाथा यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
दुसऱ्या श्रेणीमध्ये रोख रकमेची तीन पारितोषिके असून तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे त्यांचे स्वरुप आहे. या श्रेणीसाठी लोकप्रिय वर्तमानपत्र किंवा वृत्त पत्रिकांमध्ये हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमधले लेख किंवा यशोगाथा विचारात घेतल्या जातील.
या पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची नावे 1 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केली जातील.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
https://www.isro.gov.in/sites/default/files/journalism_proposal_0.pdf
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1581453)
अभ्यागत कक्ष : 212