पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्लीत अटल सामुदायिक संशोधन केंद्राचे उद्घाटन;
देशातील पारंपारिक ज्ञानाला जोड म्हणून नवे संशोधन करण्याची गरज- धर्मेंद्र प्रधान
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2019 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2019
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत अटल सामुदायिक संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्रामुळे सामुदायिक स्वरुपाच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळेल. परस्परांशी चर्चा करुन प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी याची मदत होईल असे प्रधान यावेळी म्हणाले.

देशाला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अटल इनोव्हेशन केंद्रांची महत्वाची भूमिका असेल असे प्रधान म्हणाले. स्थानिक पातळीवर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये संशोधन केंद्रे सुरु करावीत अशी सूचना प्रधान यांनी निती आयोगाला केली. प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन आयुष्यात संशोधनाला अत्यंत महत्व असून त्याला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या संशोधन केंद्रांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले पारंपारिक ज्ञान मुख्य प्रवाहात यायला मदत होईल असे ते म्हणाले.
भारतात कृषी क्षेत्रातल्या कचऱ्यातून मोठा बायोमास निर्माण होतो याचे रुपांतर ऊर्जेत करुन शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेची निर्मिती होऊ शकते अशा विषयांकडे या संशोधन केंद्रांनी लक्ष देण्याची गरज आहे असे प्रधान म्हणाले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1580840)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English