ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना

Posted On: 26 JUL 2019 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2019

 

सार्वजनिक खाद्य वितरण व्यवस्थेत सरकारने केलेल्या सुधारणा कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी या संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे एकात्मिक व्यवस्थापन करणारी (आयएम-पीडीएस) योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या सर्वांना दिलेल्या शिधापत्रिका देशभरात कुठेही चालू शकतील. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा केली जाणार आहे. लवकरच राज्ये आणि राष्ट्रीय स्तरावर प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली जाईल. ही योजना यशस्वी झाल्यासं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबवली जाईल. सध्या देशभरातील 81.34 कोटी लोकं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येतात. या सर्व लोकांना  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्न पुरवठा केला जातो अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar


(Release ID: 1580441) Visitor Counter : 125
Read this release in: English