कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
राज्यांसाठी अतिरिक्त पदांना मंजुरी
Posted On:
25 JUL 2019 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2019
केंद्र सरकार साधारणतः दर पाच वर्षाच्या कालावधीने संबंधित राज्य सरकारांशी सल्लामसलत करून प्रत्येक केडर ची रचना आणि क्षमता यांचा आढावा घेते आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करते.
महाराष्ट्रात 2018 मधे घेतलेल्या आढाव्यानुसारआयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा क्षमता 415 अशी निश्चित करण्यात आली आहे. तर भारतीय पोलीस सेवेच्या 2018 मधे महाराष्ट्रासाठी घेतलेल्या आढाव्यानुसार 317 क्षमता निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी आयएएस आणि आयपीएस केडरसाठी 2018 मधे आढावा घेण्यात आला.त्यानुसार आयएएस केडर साठीची एकूण क्षमता 361 वरून 415 करण्यात आली तर आयपीएस केडरसाठीची क्षमता 302 वरून 317 करण्यात आली आहे.
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1580318)