आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
शाळांच्या परिसरात तंबाखू उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई- गुजरातमध्ये सर्वाधिक दंडवसुली
Posted On:
23 JUL 2019 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2019
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांसंदर्भातील( जाहिरातीला प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य नियमन) कायद्यातल्या कलम 6 नुसार 18 वर्षांखालील व्यक्तीला ही उत्पादने विकण्यास व कोणत्याही शैक्षणिक संस्थेपासून 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरात त्यांची विक्री करायला मनाई करण्यात आली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून 2018-19 या वर्षात विविध राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आणि संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. यामध्ये गुजरात राज्यात सर्वात जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.गुजरातमध्ये अशा प्रकारच्या उल्लंघनाचे प्रमाण मोठे असल्याचे आढळले आहे. उल्लंघन करणाऱ्या सुमारे 8712 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून सुमारे 14,34,790 रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याखालोखाल पंजाबमध्ये 13,14,215 रुपये आणि तमिळनाडूमध्ये 10,10,400 रुपये दंड वसूल झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1579919)
Visitor Counter : 162