पंतप्रधान कार्यालय

भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली

Posted On: 23 JUL 2019 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2019

 

भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

“भारत मातेच्या या वीरपुत्राला त्यांच्या जयंतीदिनी माझी विनम्र श्रद्धांजली. ते एक निर्भिड आणि दृढनिश्चयी क्रांतिकारक होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली. त्यांच्या वीरतेची गाथा संपूर्ण देशवासीयांसाठी एक प्रेरणास्रोत आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 S.Tupe/S.Patil/P.Malandkar


(Release ID: 1579873) अभ्यागत कक्ष : 149
Read this releasein: English