उपराष्ट्रपती कार्यालय

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन


चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती

चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2019 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2019

 

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व वैज्ञानिकांचे आणि इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अंतराळ विभागातील सर्वांचे अभिनंदन केले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीतील हा एक सुवर्ण क्षण असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

चांद्रयान-2 आणि या मोहिमेचे प्रक्षेपक हे पूर्णपणे भारतात बनवले गेल्यामुळे उपराष्ट्रपतींनी विशेष अभिनंदन केले.

चांद्रयान-2 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण हा एक सुवर्ण क्षण असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीतील महत्वाचा टप्पा ठरल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

चंद्राच्या आत्तापर्यंत शोध न घेतलेल्या भागावर चांद्रयान-2 यशस्वीरित्या उतरेल आणि ही मोहीम फत्ते होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

चांद्रयान-2 भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप आहे. या मोहिमेमुळे असे आव्हान स्वीकारलेल्या इतर तीन देशांच्या पंक्तीत भारताने आपले स्थान मिळवले आहे. आजची मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची साक्ष असल्याचे ते म्हणाले

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1579808) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English