आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
11 राज्यांच्या 277 जिल्ह्यांमध्ये जंतुनाशक कार्यक्रम संपन्न
Posted On:
19 JUL 2019 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत फेब्रुवारी 2015 मध्ये देशातल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 277 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय जंतुनाशक दिवस राबवण्यास सुरूवात झाली. महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या 1 ते 19 वर्ष वयोगटातल्या 8 कोटी 98 लाख मुलांवर अभियानांतर्गत जंतुनाशक उपचार करण्यात आले. 2016 पासून देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात ही मोहिम राबवली जाते. फेब्रुवारी 2019 मध्ये 22 कोटी 12 लाख मुलांना जंतुनाशक औषध देण्यात आले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1579483)
अभ्यागत कक्ष : 105