सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सौर चरखा अभियानासाठी 36 प्रस्तावांची निवड

Posted On: 18 JUL 2019 5:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 जुलै 2019

 

देशभरात 50 सौर चरखा क्लस्टर्स सुरू करण्याकरिता सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सौर चरखा अभियान सुरू केले आहे. यासाठी वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठी 550 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून सुमारे एक लाख व्यक्तींना थेट रोजगार निर्माण होणार आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबईतर्फे अभियान राबवले जात आहे. अभियानांतर्गत 36 प्रस्तावांची निवड करण्यात आली असून त्यांना विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1579385) अभ्यागत कक्ष : 120
Read this releasein: English