वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-संयुक्त राष्ट्र संघ यांची संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची 13वी बैठक संपन्न

Posted On: 18 JUL 2019 4:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 जुलै 2019

 

वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि युकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री लिॲम फॉक्स यांनी लंडन येथे 15 जुलै 2019 रोजी भारत-युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची 13वी बैठक झाली.

2015-2018 या वर्षांमध्ये दोन्ही देशांमधला व्यापार 27 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात देण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी अधिक वृद्धींगत करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

एप्रिल 2018 मध्ये दोन्ही देशांमधल्या व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी नवी भारत-युके व्यापार भागीदारी जाहीर केली.

12व्या जेटकोमध्ये सहमती झालेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त कार्यकारी गट काम करत आहे.

अन्न आणि पेय, माहिती संवाद तंत्रज्ञान, जीव विज्ञान आणि सेवा सांख्यिकी याबाबत दोन्ही देशांमध्ये सुरू झालेला संवाद यावेळी अधोरेखित करण्यात आला.

युके-भारत बहुपक्षीय संवादाच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचे दोन्ही देशांनी कौतुक केले.

युके-भारत फास्ट ट्रॅक स्टार्ट अप फंड क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे दोन्ही देशांनी कौतुक केले.

व्यापार स्थैर्य आणि नियामक व्यवस्थेचे महत्व दोन्ही देशांनी व्यक्त केले. जागतिक बँकेच्या व्यापार सुलभतेत भारताने 77 व्या स्थानावर झेप घेत केलेल्या प्रगतीबाबत युक्रेने भारताचे अभिनंदन केले.

तांत्रिक सहकार्य, प्रगत उत्पादने आणि अभियांत्रिकी, स्मार्ट शहरे याबाबत संयुक्त कार्यकारी गटाने केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक 13व्या बैठकीत करण्यात आले केले. नव्याने स्थापन झालेल्या गटांकडून आम्हाला अपेक्षा आहे. आयसीटीच्या व्यापार, खाद्य व पेये आणि जीवविज्ञानावर स्थापन संयुक्त कार्यसमुहांसोबत ते काम करतील, असे दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितले.

जेटकोची पुढील बैठक वर्ष 2020 मध्ये नवी दिल्ली येथे होईल.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 


(Release ID: 1579341)
Read this release in: English