आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मुले ही आरोग्याची खरी दूत-डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 17 JUL 2019 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जुलै 2019

 

जीवाणू, विषाणू, परजीवींमुळे होणारे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनीयासारख्या आजारांच्या नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी लोकसहभागाची आवश्यकता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये यासंदर्भातल्या तीन दिवसांच्या जनजागरुकता अभियानाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते त्यांनी समजावून सांगितले. साध्या-सोप्या उपायांद्वारे परिसर स्वच्छ ठेवता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांनी प्रत्येक घरापर्यंत संदेश पोहोचवल्यामुळे पोलिओ अभियान यशस्वी होऊ शकले. स्वच्छता आणि आरोग्य संपन्न जीवनासाठीच्या सवयींचा संदेश मुलांनी त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1579227) Visitor Counter : 111


Read this release in: English