मंत्रिमंडळ

पंधराव्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींमध्ये सुधारणा करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेसाठीच्या  निधीसंदर्भातील समस्या सोडविण्याबाबत तरतूद

Posted On: 17 JUL 2019 6:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जुलै 2019

 

देशाची अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण यासाठी निधीबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी 15व्या वित्त आयोगाला सबल करण्याकरता प्रस्तावित सुधारणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना वित्त आयोग कायदा 1951 आणि संविधानाच्या कलम 280 (1) अंतर्गत 27 नोव्हेंबर 2017 रोजी राष्ट्रपतींद्वारा करण्यात आली होती. 15व्या वित्त आयोगाची स्थापना 1 एप्रिल 2020 पासून पुढील पाच वर्षांसाठी शिफारसी देण्यासाठी करण्यात आली आहे.

आयोगाच्या संदर्भ अटी अंतर्गत संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेसाठी पर्याप्त संसाधने सुनिश्चित करण्यासंदर्भातील प्रस्ताव करण्यात आला आहे.

सुधारणे अंतर्गत, 15 वा वित्त आयोग संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेसाठी पर्याप्त वित्तीय स्रोतांची व्यवस्था करण्यासाठी इतर काही प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे का यासंदर्भात माहिती घेईल आणि त्याचबरोबर ही प्रणाली कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल हेही बघेल.

 

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

 



(Release ID: 1579221) Visitor Counter : 132


Read this release in: English