आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

सहजनवा आणि दोहरीघाट दरम्यान 81.17 किमीचा नवा रेल्वेमार्ग बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1319.75 कोटी रुपये, वर्ष 2023-24 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

Posted On: 17 JUL 2019 6:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींवरील समितीने सहजनवा आणि दोहरीघाटदरम्यान (81.17 किमी) नवा रेल्वेमार्ग बांधायला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1319.75 कोटी रुपये असून तो वर्ष 2023-24 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. उत्तर पूर्व रेल्वेच्या बांधकाम संस्थेकडून तो राबवला जाईल.

प्रकल्पक्षेत्र दाट लोकवस्तीचे असून आर्थिकदृष्ट्या मागास आहे. रस्ते वाहतुकीची सुविधा अपुरी असलेला आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे नागरिकांना रेल्वेसुविधा उपलब्ध होईल आणि या क्षेत्रात लघुउद्योगांच्या विकासाला सहाय्य मिळेल. या प्रकल्पाच्या बांधणीमुळे सुमारे 19.48 लाख श्रमदिवस थेट रोजगार उपलब्ध होईल.

सहजनवा ते दोहरीघाटमधला बहुतांश भाग उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर जिल्ह्यातला असून अल्पसा भाग माऊ जिल्ह्यात आहे. इंदारा-दोहरीघाटचे गेज रुपांतर या आधीच मंजूर करण्यात आले असून नव्या मार्गामुळे गहाळ दुवा पूर्ण होणार आहे आणि गोरखपूरला न जाता पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

या प्रकलच्या पूर्ततेनंतर छप्रा ते लखनौदरम्यान गोरखपूरमधली कोंडी टाळणारा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. रेल्वेवाहतुकीच्या सहाय्याने या मागास भागाचा अधिक चांगल्याप्रकारे सामाजिक-आर्थिक विकास साधला जाईल. त्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1579220) Visitor Counter : 103


Read this release in: English