आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

अलाहाबाद-मुघलसराई दरम्यान (प. दीनदयाळ उपाध्याय जं.) 150 किलोमीटर लांबीचा तिसरा रेल्वेमार्ग बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 2649.44 कोटी रुपये, प्रकल्प 2023-24 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

Posted On: 17 JUL 2019 6:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींवरील समितीची बैठक झाली. अलाहाबाद-मुघलसराई दरम्यान (आताचे पं. दीनदयाळ उपाध्याय जं.) 150 किलोमीटर लांबीचा तिसरा रेल्वेमार्ग बांधायला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 2649.44 कोटी रुपये आहे. वर्ष 2023-24 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. उत्तर पूर्व रेल्वेच्या बांधकाम संस्थेकडून तो राबवला जाईल.

भविष्य काळातला वाहतुकीवरचा ताण कमी व्हायला या प्रकल्पामुळे सहाय्य मिळणार आहे. सध्या या मार्गावर क्षमतेपेक्षा कित्येक पट अधिक प्रवासी व मालवाहतूक सुरू आहे. परिणामी रेल्वेगाड्यांचा प्रचंड खोळंबा होत असतो. या प्रकल्पामुळे क्षमतावृद्धी होईल, खोळंबा कमी होईल आणि भविष्यकाळातील गरज पूर्ण होण्यास मदत मिळेल. अलाहाबाद आणि मुघलसराई दरम्यान तिसरा मार्ग बांधायला मंजुरी मिळाल्यामुळे छिवकी, नैनी येथे होणारा खोळंबा टळण्यास मदत होईल आणि राष्ट्रीय राजधानीला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील माल आणि प्रवासी वाहतूक वेळेत व्हायला मदत होईल.

या प्रकल्पामुळे सुमारे 36 लाख श्रमदिवस बांधकाम होणार असल्याने थेट रोजगार निर्माण होईल.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1579219) Visitor Counter : 89


Read this release in: English