रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2019-20 साठीच्या पुरवणी मागण्या लोकसभेकडून मंजूर
Posted On:
16 JUL 2019 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2019
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2019-20 साठीच्या पुरवणी मागण्या आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाल्या.
देशासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम, आपले मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरूच ठेवेल, अशी ग्वाही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेला दिली.
भूसंपादनातील खर्च वाढल्यामुळे भारतमाला प्रकल्पासाठीचा खर्च 5,35,000 कोटी रुपयांवरुन जवळपास 8,41,000 कोटी रुपयांपर्यंत वाढला असला तरी प्रकल्पांसाठी निधीचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
रस्ते सुरक्षेवर मंत्रालय विशेष लक्ष पुरवत आहे. महामार्गावरच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी एडीबीने 7,000 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती गडकरी यांनी सदनाला दिली.
S.Tupe/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1579008)
अभ्यागत कक्ष : 102