सांस्कृतिक मंत्रालय
संगीत नाटक अकादमीकडून वर्ष 2018च्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांची घोषणा
Posted On:
16 JUL 2019 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2019
संगीत नाटक अकादमीने वर्ष 2018च्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांची घोषणा केली आहे. 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप असून यासाठी 32 युवा कलाकारांची निवड झाली आहे.
यामध्ये समीहन कशाळकर आणि रुचिरा केदार यांची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी निवड झाली आहे.
संगीत नाटक, लोकसंगीत, लोकनृत्य आदी क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 40 वर्षांखालील युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
संगीत आणि नृत्य क्षेत्रात प्रत्येकी 8 कलाकारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्यक्षेत्रात 7 कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पारंपरिक/लोककला/आदिवासी संगीत/कळसुत्री बाहुल्यांचा खेळ या क्षेत्रात 8 कलाकारांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
S.Tupe/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1578961)
Visitor Counter : 111